Thursday, September 3, 2020

सर पावसाची आली

सर पावसाची आली.....

काळ्या ढगानं आभाळ भरलं
थेंब अमृताचं धरतीवर सांडलं
कशी अवनीवर हिरवाई पसरली
सर पावसाची आली....

सुर्या देवाचं दर्शन होईना
जणू आभाळास फुटला पान्हा
सर्व सृष्टीची तहान सरली
सर पावसाची आली.....

इंद्रधनुची सजली कमान
हरवून जातयं आपल भान
शुद्ध आत्ता सारी हरली
सर पावसाची आली....

वरूणदेवाचं हे सुंदर वरदान
तृप्त धरणी दिसते छान
कणांकणांतून सृष्टी गहिवरली
सर पावसाची आली....

- सुयश गावड

No comments:

Post a Comment