चिमटीत पकडून ठेवायचंय खूप काही
शब्द, त्यांचे नेमके अर्थ
स्पर्श, त्यांचे नेमके अर्थ
सगळंच निसटून जायच्या आधी
घट्ट धरून ठेवायचंय खूप काही.
देहावरच्या खुणा, अस्पष्ट
मनावरच्या खुणा, जरा जास्तच स्पष्ट
बुद्धी फार काम करायला
लागायच्या आधीच
गोंदून घ्यायचंय खूप काही.
माझा श्वास, तुझ्यात गुंफण
तुझा श्वास, माझ्यात रिंगण
सवय ‘व्यसन’ बनण्याआधीच
सोडवून घ्यायचंय खूप काही.
मोकळं व्हायचंय..बेभान जगायचंय
होऊन द्यायचंय खूप काही..!!
- स्पृहा जोशी
No comments:
Post a Comment