आक्का
मालती अनंत पाटील म्हणजे तुम्हा-आम्हा सर्वांची आक्का.काल दुपारी आपल्यातून निघून गेली.आणि मन एकदम भूतकाळात गेले.आबाल वृद्धांपर्यंत सर्वांचीच आक्का. आक्का म्हणजे प्रेमळ व शांत स्वरूप.आम्ही सुट्टीत गावी गेलो की आवर्जून भाई आणि आक्काला भेटायला बंगल्यात जात असू.तेव्हा आक्का सर्वांचीच आपुलकीने विचारपूस करत असे ते आठवले.ते अगदी आत्तापर्यंत आजारी असतानासुद्धा तिला बघायला गेल्यावर आई 'पपा ताई भावजी ते छोट्या शौर्यपर्यंत सर्वांचीच ती विचारपूस करीत असे.आक्काचा हा स्वभाव मला खूप आवडायचा.तिला सर्वांबद्दलच आत्मियता.
आक्काचा प्रवास म्हणजे वरळी कोळीवाडा ते माटुंगा आणि नंतर परत गाव असा होता.आक्काने भाईंना खूप मोलाची साथ दिली आणि तिन्ही मुलांना उत्तम संस्कार.पपाकडून आक्काबदल खूप ऐकले होते.आक्काकडे मुंबईमध्ये खूप लोकांचा राबता होता आणि आक्का त्याच प्रेमाने सर्वांचे आदरातिथ्य करत असे.पपाना आक्का आणि भाईचा विशेष आदर होता.ते नेहमी त्यांच्या गोष्टी आम्हाला सांगत असे.आक्काच्या जाण्याने एक सुस्वभावी व सोज्वळ व्यक्तिमत्त्व हरपले.
आक्काला भावपूर्ण श्रद्धांजली!!!
No comments:
Post a Comment