जीवनाच्या वाटेवर तुझी साथ आहे
जीवनाच्या वाटेवर तुझी साथ आहे
म्हणून आयुष्यात आता मी निवांत आहे
तू हात देता तुझा माझ्या हाती
हृदयी उसळली प्रेमाची भरती
आता मनीची लाट ती शांत आहे
जीवनाच्या वाटेवर तुझी साथ आहे
आयुष्यात माझ्या एकटेपणाचा होता आक्रोश
हातात हात पडता मैत्रीचा
मिटून गेला तो आकांत आहे
जीवनाच्या वाटेवर तुझी साथ आहे
आयुष्याची होईल सोपी ही पायवाट
बदलून जाईल जगण्याचा थाट
उजळली पहाट संपली रात आहे
जीवनाच्या वाटेवर तुझी साथ आहे
-सुयश गावड
No comments:
Post a Comment