
लहानपणी
मी दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये गावी जायचो.आमच्या गावच्या घरासमोर एक मोठे गुलमोहराचे
झाड होते.घरासमोर म्हणजे अगदी बरोबर घरासमोर नव्हे.त्या गुलमोहरच्या झाडाखाली आम्ही खेळायचो.गुलमोहराचे ते डेरेदार झाड
माझ्यासाठी नेहमीच कुतूहलाचा विषय होता.दिवाळीमध्ये त्याच झाडाखाली आम्ही फटाके फोडायचो.फुलबाजीची मागची तार वाकवून मग त्या पेटवून
त्या झाडयाच्या फांद्यानवर टाकायचो आणि संपूर्ण झाड प्रकाशमय करायचो.तेव्हा वयाने लहान असल्यामुळे आम्ही त्या झाडाला दुखापत करतो आहे हे कधी लक्ष्यात
नाही आले.
उन्हाळ्याच्या
सुट्टीमध्ये गावी जायचो तेव्हा हे गुलमोहराचे झाड
संपूर्ण लालभडक अश्या फुल्यांनी बहरून जायचे.ती आलेली लालभडक
फुले व त्यांनी संपूर्ण
बहरून गेलेले ते झाड बघणे
म्हणजे एक सुखद पर्वणी
होती.त्या झाडाखाली लाल फुल्यांचा सडा पडलेला असायचा आणि त्या सडावरून अनवाणी चालत जाताना पायच्या तळव्यांना होणाऱ्या गुदगुदल्या आजही आठवतात. त्या झाडाखाली आम्ही तासनतास खेळायचो. वीज गेली की चटई टाकून
त्याच झाडाखाली विसावायचो.कित्येकदा पत्याचा फड त्याच झाडाखाली
रंगायचा.गाण्याच्या भेंड्यामध्ये गायली गेलेली अनेक गाणी ह्या झाडाने ऐकली असतील.ह्या गुलमोहोरच्या फुलातील परागकणांनी मारामारी हा खेळ खेळायचो.
खूप मज्जा यायची हा खेळ खेळायला.ह्याच झाडाखाली बसून आम्ही आमच्या आत्या व काकांची हळद
व लग्नकार्यातील विधी बघितले.
माझ्या
बालपणातील ते गुलमोहोराचे झाड
म्हणजे माझ्या आयुष्यातील सुंदर आठवण आहे.जसे आम्ही मोठे होत गेलो तसे ते झाड ही
मोठे होत गेले.परंतु काही वर्षांपूर्वी गुजरातला झालेल्या चक्रीवादळामुळे आमचे हे झाड मुळापासून
उन्मळून पडले.चक्रीवादळाचा तडाखा त्याला सहन नाही करता आला.आता आमच्या घरासमोर ते गुलमोहोराचे झाड
नाही पण त्याच्या आठवणी
मात्र माझ्या मनामध्ये घर करून आहे.
आजही
उन्हाळा आला आणि कोणतेही गुलमोहोराचे झाड बघितले तरी मन त्याच गुलमोहोराच्या
झाडाखाली रुंजी घालते.
- सुयश
गावड
No comments:
Post a Comment