Sunday, July 5, 2020

आणि फेसबुकच्या खाणीत हिरा गवसला.....

आणि फेसबुकच्या खाणीत हिरा गवसला....

फेसबुक ...रोजच्या वापरातील एक अँप....फेसबुकवर त्या दिवशी टाईमपास करताना ह्याची प्रोफाइल नजरेस आली.सहज उत्सुकता म्हणून ह्याची प्रोफाइल हाताळून बघितली. त्याने लिहीलेले अनेक लेख,विविध विषयांवरील कविता आणि अनेक फोटो बघून मी भारावून गेलो.आणि ह्याच्याबरोबर मैत्री करायची असे मीच माझ्या मनी ठरवून टाकले.म्हणून त्याला friend request पाठवली आणि त्याने ती तत्परतेने  स्वीकारली ह्याचा मला खूप आनंद झाला.मग मी त्याला मेससेंजरवर hi पाठवले त्याच्याकडून hi असा रिप्लाय आला.असेच दोन तीन दिवस बोलल्यानंतर काल आम्ही औपचारिकता सोडून बोलू लागलो.मग बोलता बोलता समजले की तो Mechanical engineer आहे आणि गेली दहा वर्षे दुबईमध्ये वास्तव्यास आहे.

मी आधीच त्याचे मनाच्या झरोक्यामधून ह्या कवितासंग्रहाचे मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ बघितले होते आणि मला ते मनापासून आवडले होते.मग मी विचार करू लागलो की जो माणूस इंजिनिअर असून आणि त्यामध्ये mechanical इंजिनिअर  असूनसुद्धा आणि दहा वर्षे आपल्या देशापासून लांब असूनसुद्धा ह्याने आपली कला जोपासली होती ह्याचे कौतुक वाटले.आज तो बोलता बोलता म्हणाला तुझा पत्ता पाठव मी कवितासंग्रह पाठवतो पोस्टाने ते ऐकून तर मला खूपच आनंद झाला.मग त्याने त्याच्या ब्लॉगची लिंक पाठवली मी त्याचा ब्लॉग बघितला त्यावरील त्याने लिहिलेले अनेक लेख,अनेक विषयांवरील कविता,प्रवास वर्णने वाचून खूप आनंद झाला मनाला.

फेसबुक हे एक social media app आहे...आणि ह्या कोरोनारूपी महामारीमध्ये social distancing सांभाळायचे होते ह्या दोहोंचा ताळमेळ ठेवून आम्ही ह्या social media वर मैत्री केली होती.आज आम्ही खूप गप्पा मारल्या व्हाट्सअप्प आणि फेसबुक मेससेंजरवर.त्याच्याशी बोलून खूप छान वाटले आणि आश्चर्यसुद्धा.आश्चर्य ह्याकरीता की खरच आमच्या मैत्रीला दोनच दिवस झाले का?तरी आम्ही एवढे ओळखीचे कसे झालो?विविध विषयांवर चर्चा केली ...हो चर्चाच म्हणावी लागेल.lockdown मध्ये मी काढलेले निसर्गाचे फोटो त्याला पाठवले... असेच कधीतरी मी लिहिलेले लेख त्याला पाठविले(उगाच मी लेख म्हणतो आहे माझ्यादृष्टीने ते माझ्या मनीचे भाव)त्याला फोटो आणि लेख खूप आवडले त्याने माझे भरभरून कौतुक केले.आणि एक खरा मित्र म्हणून त्याने मला असे सुचविले की फोटो instagram वर अपलोड कर आणि एवढे छान लिहितोस तर स्वतःचा ब्लॉग लिहावा.आणि मी असेच लिहीत राहवे असे त्याने सांगितले.

ह्या lockdown मध्ये घरची मंडळी घरीच होती म्हणून ते परत एकदा मनाने एकत्र आले पण आम्ही दोघे फेसबुकसारख्या social अँपवर आणि साता समुद्रापार असूनसुद्धा नव्याने झालेल्या मैत्रीमध्ये जवळ आलो...ह्याचा मला सार्थ अभिमान आहे.एक चांगला मित्र मिळाला मला...मित्र काय जणू हिराच सापडला मला फेसबुकरुपी खाणीमध्ये...

तो हिरा म्हणजेच माझा मित्र आहे..... गणेश भाऊसाहेब पोटफोडे

खाली दिलेली लिंक ही त्याच्या ब्लॉगची आहे ...तर जरूर त्याच्या ब्लॉगला भेट द्या आणि आनंद मिळवा.


https://ganeshpotphode.blogspot.com/


- सुयश गावड

No comments:

Post a Comment