🎂आईचा ६१ वा वाढदिवस🎂
आई.....
पहिल्यादा तुझ्याबद्दल लिहिणार .मध्ये एवढी वर्षे गेली तुझ्याबद्दल लिहायला.आज तुझ्या ६१ व्या वाढदिवसाबद्दलचे औचित्य साधून लिहायला घेतलें. कोठून लिहायला सुरुवात करू तेच कळत नाही. आणि माझे लिखाण जास्त मनाला लावून घेऊ नकोस.परंतु तुझ्या स्वभावधर्मानुसार तू ते लावून घेणार हे नक्की.आई.....तू आईपेक्षा मैत्रीण जास्त आहेस....
My bestest friend म्हणून आयुष्यात चांगल्या मैत्रिणीची कधी गरज भासली नाही.
मला भरपूर लोक सांगतात की तू तुझ्या आईसारखा दिसतोस.मातृमुखी आहेस तू ,असे सांगितल्यावर मला खूप छान वाटते.मी तुझ्यासारखा दिसत नाही तर तुझ्यासारखे गुण पण माझ्यात आहेत .तुझ्यासारखे खूप बोलणे म्हणजे गप्पीस्ट स्वभाव.खाणे हा आपला आवडता छंद. हो छंदच म्हणावे लागेल कारण नुसतं खाणच नाही तर दुसऱ्याला खाण बनवून घालण्यात जास्त आनंद.माझे तर ठाम मत आहे अन्नपूर्णा मातेचं तुझ्यावर वरदहस्त आहे.खरेदी करणे हा तुझा दुसरा छंद पण ती खरेदी दुसऱ्यांची.आणि कपड्यांची तुझी निवड खूपच लाजवाब म्हणूनच आज ही मी तुझ्या निवडीची शर्टस घेतो....
तुझा लागवी आणि मनस्वी स्वभाव फार भावतो.तुझे आयुष्य खूप खडतर गेले,तू खूप कष्ट केले .आज जरी सुखाचे क्षण जरी आले तरी तू आधी होती तशीच आहे.तसुभर पण फरक नाही झाला.तुझा सर्वात मला आवडणारा गुण म्हणजे तुझी दुर्दम्य इच्छाशक्ती .आपल्यामध्ये आणखीन एक समान गोष्ट म्हणजे भरपूर बोलणे.
मी नेहमी म्हणायचो प्लास्टिकचा चमचा घेऊन जन्माला आलो आहे पण मी खूप चुकीचा होतो कारण आई तू आणि पपानी मला सोन्याचा नाही तर हिरेजडीत चमचा दिला आहे.
मला हवे ते तुम्ही मला दिले .माझे भरपूर लाड केलेत, करत आहेत आणि करत राहणार हे मात्र नक्की...
माझ्या आयुष्यामध्ये मी पहिल पुस्तक श्यामची आई हे वाचले होते ते पुस्तक मनाला खूप भावले होते तेव्हा वय लहान असल्याने पुस्तकाची व्याप्ती कळली नव्हती पण आज समजते त्या पुस्तकातील श्यामची आई.श्यामची आई समजली तशीच तू आहेस पण मी तुझा श्याम काही होऊ शकलो नाही ह्याची खंत मात्र आहे...
मला दुसरीत असताना मराठीमध्ये दिनूचे बिल नावाचा पाठ होता.तुला आठवत असेल आई कारण तूच शिकवलं होता तो. मी पण नेहमी त्या दिनूप्रमाणेच बिल करण्याचा अट्टाहास करतो आणि नेहमी माती खातो पण तू त्या दिनूच्या आईसारखे बिल करते नेहमी बाकी शून्य.....
मी नेहमी चुकत गेलो आणि तू नेहमी मोठ्या मनाने मला माफ करत गेलीस कारण तू आई आहेस..
वेड कोकरु वाट चुकलेले....तशी गत झाली आहे माझी...
दुसऱ्यांसाठी खूप जगलीस आत्ता तरी स्वतःसाठी जग....
एवढे एकच तुला सांगीन.
बापू तुला उदंड व निरोगी आयुष्य देवो हीच चण्डिकाकुळाचरणी प्रार्थना
आई वाढदिवसाच्या अनिरुद्ध शुभेच्छा💐💐💐
🎂Happy birthday Aai🎂
-वाट चुकलेले तुझे कोकरू
No comments:
Post a Comment