व्यक्ती आणि वल्ली
२०१९ हे वर्ष पु.ल.देशपांडे- जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरे करण्यात आले. त्यानिमित्ताने मनात पु.ल.देशपांडेंच्या बऱ्याच आठवणी दाटून आल्या.जसे की त्यांनी लिहिली अनेक दर्जेदार पुस्तके, नाटके.तुझे आहे तुजपाशी,सुंदर मी होणार, ती फुलराणी ही नाटकं तर त्यांनी लिहिलेली बटाटयाची चाळ, अपूर्वाई,पूर्वरंग,व्यक्ती आणि वल्ली अशी अनेक पुस्तके. जवळ जवळ मी सर्वच पुस्तक त्यांची वाचली आहेत पण त्यात सर्वात भावलेले पुस्तक म्हणजे व्यक्ती आणि वल्ली.मी हे पुस्तक आधी पण वाचले होते पण ह्या त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने परत एकदा व्यक्ती आणि वल्ली हे पुस्तक वाचायला घेतले.आणि परत एकदा ह्या सर्व व्यक्तीचा आणि त्यांच्यातील वल्लीचा मनमुराद आनंद लुटला.
मग तो नारायण असो की.... हरी तात्या असो की... नामू परिट असो की....सखाराम गटणे असो की.....अंतू बरवा असो की.... पेस्टन काका असो सर्वच व्यक्ती मस्त आहेत. पु ल देशपांड्याच्या लेखनशैलीबद्दल मी काय बोलणार ती तर सर्वांनाच माहीत आहे की.पण त्यांच्या लेखणीतून ही सर्व व्यक्ती आपल्याला भेटल्यासारखी वाटतात व आपल्या कायम लक्ष्यात राहतात .
पु.ल.देशपांड्याना अनेकांनी विचारले होते की तुम्हाला ह्या व्यक्ती खरोखरच भेटल्या आहेत का?तर पु.ल म्हणतात की.... म्हटल्या तर भेटल्या आहेत ,म्हटल्या तर नाहीत.ह्या पुस्तकाला नटवणारे चित्रकार गोडसेनी पु.ल ना विचारले होते की ही माणसं जर जिवंत होऊन तुम्हाला भेटली तर काय कराल?पु ल म्हणाले, -मी त्यांना कडकडून भेटेन!
खरंच मला पण असेच वाटायचे की मला अश्या व्यक्ती भेटल्या तर?पण नंतर मनात विचार येतो की अश्या व्यक्ती भेटील,भेटत राहतील पण त्यांच्यातील दडलेली वल्ली मी ओळखू शकेन?तर उत्तर आहे नाही कारण ते पु ल होते म्हणून ते त्यांच्यातील वल्लीपण ओळखू शकले.
ह्या सर्व व्यक्तीचे वल्लीपणा रंगवताना पु ल नी त्यांच्यावर विनोद केले पण त्याला करुणेची किनार होती ,प्रत्येक व्यक्तीबद्दल असणारी पु ल ची आत्मीयता दिसून येते.हे पुस्तक वाचताना मनाला एक निर्मळ आनंद मिळतो.आणि जर पु.ल च्या ह्या व्यक्तींचे वल्लीपण जर पु ल च्या तोंडून ऐकण्याचे भाग्य ज्यांना लाभले ते खरे नशीबवान.
आपल्याही आयुष्यात अशी अनेक माणसे/व्यक्ती आपल्याला भेटतात पण त्याच्यातील वल्लीपण जाणण्यासाठी पु.ल.सारखी शोधक नजर हवी. योग्य वेळी त्या व्यक्तितील वल्लीपण आपल्याला हेरता आले पाहिजे.
अश्या पु.ल.देशपांडे आणि त्यांच्या व्यक्तीना मनापासून सलाम!!!
- सुयश गावड
No comments:
Post a Comment