Saturday, August 3, 2024

कधी तरी असे होते


कधी तरी असे होते कुणी तरी कुठे भेटून जातो
अन आपलीच ओळख आपल्याला करून देतो 
आणि आपण आपल्याला नव्याने ओळखू लागतो
नव्याने करून दिलेली ओळख खूप काही देऊन जाते
डोळयात पाणी अन ओठावर हसू देऊन जाते
आपल्या नकळत झालेल्या चुका कळून जातात
आपण दुखावलेली माणसं डोळ्यासमोर तरारळून जातात
कधी आपण त्यांना भेटतो आणि त्यांना घट्ट मिठी मारतो 
असे काहीसे होऊन जाते जे आधी कधी नव्हते घडले
पण आपले मन खूप खूप हलके हलकेसे होऊन जाते

-सुयश गावड

No comments:

Post a Comment