Thursday, July 14, 2022

तिचे केस


कॉलेजमध्ये ती माझ्या पुढच्या बाकावर बसायची
लांब सडक पण जरासे पातळ केस होते तिचे
मला खूप आवडायचे लांब सडक केस तिचे
तिच्या सावळ्या रंगाला काळेभोर केस उठून दिसायचे
कॉलेजच्या तासाला नोट्स लिहिताना तिचे केस नेमके आड यायचे
आधी तिला केस बाजूला घे हे सांगायला अवघडल्यासारखे व्ह्यायचे
नंतर हेच केसाचे कारण तिच्याकडून नोट्स घेण्यासाठी बहाणा झाला
कोण जाणे तिच्या लांबसडक केसाचे मला एवढे अप्रूप का होते
कधी तिच्या नोट्स घेतल्या तर त्या वहीत तिा एखादा केस मिळणार कॉलेज संपले तरी अजून ते नाही मला उमगले की मला ती आवडायची की तिचे केस

No comments:

Post a Comment