कॉलेजमध्ये ती माझ्या पुढच्या बाकावर बसायची
लांब सडक पण जरासे पातळ केस होते तिचे
मला खूप आवडायचे लांब सडक केस तिचे
तिच्या सावळ्या रंगाला काळेभोर केस उठून दिसायचे
कॉलेजच्या तासाला नोट्स लिहिताना तिचे केस नेमके आड यायचे
आधी तिला केस बाजूला घे हे सांगायला अवघडल्यासारखे व्ह्यायचे
नंतर हेच केसाचे कारण तिच्याकडून नोट्स घेण्यासाठी बहाणा झाला
कोण जाणे तिच्या लांबसडक केसाचे मला एवढे अप्रूप का होते
कधी तिच्या नोट्स घेतल्या तर त्या वहीत तिचा एखादा केस मिळणार कॉलेज संपले तरी अजून ते नाही मला उमगले की मला ती आवडायची की तिचे केस
Thursday, July 14, 2022
तिचे केस
तुझी सोबत
तुझी सोबत म्हणजे पौर्णिमेचा प्रकाश
तुझी सोबत म्हणजे सुखाचे चांदणे
तुझी सोबत म्हणजे उष्मातील शीतलता
तुझी सोबत म्हणजे पावसातला शिडकावा
तुझी सोबत म्हणजे बकुळीचा सुगंध
तुझी सोबत म्हणजे आयुष्याची शिदोरी
तुझी सोबत म्हणजे जन्मभराची साथ
Subscribe to:
Posts (Atom)
-
गोधडी गोधडी....मायेची ऊब. आईच्या किंवा आजीच्या साडीची, लुगड्याची हाताने शिवलेली गोधडी.त्यांच्या मायेसारखीच मऊसूत व तलम.आपल्या महारा...
-
झोपाळा... झोपाळा... सर्वांच्याच आवडीचे ठिकाण.लहानपणी मला पण आपल्या घरी एक झोपाळा असावा असे नेहमी वाटायचे.पण मुंबईसारख्या शहराम...