कधी सांजवेळी तुझी आठवण येई
तेव्हा पापणीला माझ्या पूर येई
आठवणी ओल्या तुझ्या माझ्या
स्वप्नांच्या गावी दूर घेऊन जाई
आठवणींचा आपला हा पसारा
मनी काहूर माजवून जाई
नको त्या आठवणींचा छळ
नको आत्ता मनी कळ
मिटवू म्हणता मिटत नाही आठवणी
म्हणूनच प्रिये साठवून माझ्या आठवणी
सुयश गावड
No comments:
Post a Comment