Sunday, June 13, 2021

आभाळाला मिळो पुन्हा

आभाळाला मिळो पुन्हा

रिता होऊनिया शुभ्र
काळ्या ढगांचा हा ससा
आभाळाला मिळो पुन्हा
निळ्या तळ्याचा आरसा

सरी झेलता झेलता
वय व्हावे अवखळ
हाती हात येता तुझे
उमटावी गोड कळ

इंद्रधनुष्याला बांधू
अनिलाचे घोडे सात
कडेकपारित जाऊ
वार्‍यासंगे आत आत

तुझ्या पायांचे पैंजण
व्हावे निर्झराचे गाणे
धुकं जाऊनिया ऊतू
यावे पावसाला न्हाणे

#गीतेशगजाननशिंदे 

1 comment:

  1. अप्रतिम
    भगवंत नार्वेकर

    ReplyDelete