कातरवेळ
कातरवेळी मन कात्रीत सापडते
जेव्हा तुझी आठवण येते
आणि मन परत भूतकाळात रमते
तुझ्यासोबतची भेट पुन्हा एकदा आठवते
आणि त्या आठवणींचा काहूर मनी माजते
नको त्या गोष्टीत मन रमते
मनीचा सल पुन्हा उफाळून येते
झालेली जखम भळभळून वाहते
नाही म्हणता मन आठवणींच्या डोहामध्ये उडी घेते
आणि हाताशी उरलेल्या आठवणींचा गाळ लागतो
अन मन भानावर येते तोवर कातरवेळ सरून अंधारलेले असते
- सुयश गावड
सुंदर व्यक्त झलायस मित्रा
ReplyDeleteभगवंत नार्वेकर