फ्रेशर्स...सतरंगी फ्रेशर्सची अतरंगी यारी....
२०१६ मध्ये झी युवा ही खास तरुणांसाठी चैनल प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन आले. कॉलेज लाईफवर बेतलेली एक खास मालिका या वाहिनीवर प्रेक्षकांना पाहायला मिळाली आणि ही मालिका म्हणजे फ्रेशर्स. फ्रेशर्स मालिकेमध्ये महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातून महाविद्यालयीन शिक्षणासाठी मुंबईमध्ये आलेल्या ७ तरुणांच्या स्वप्नांच्या प्रवासाची ही गोष्ट आहे. खूप कमी वेळातच या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केले. या मालिकेतील कलाकार ओंकार राऊत, मिताली मयेकर, रसिका वेंगुर्लेकर, रश्मी अनपट, अमृता देशमुख, सिद्धार्थ खिरीड आणि शुभंकर तावडे यांचा अभिनय वाखाणण्याजोगा आहे. ‘फ्रेशर्स’ ही मालिका आपल्यातील प्रत्येकाच्या कॉलेजच्या दिवसांना उजाळा देण्यात यशस्वी ठरली आहे.डिग्री कॉलेजमध्ये प्रवेश घेणाऱ्या काही विद्यार्थ्यांवर मालिका होती. कॉलेज लाईफ धमाल-मस्ती दाखवणाऱ्या ह्या मालिकेला तरुण मंडळीने खूप उत्स्फुर्त प्रतिसाद दिला आणि अल्पावधीतच ही मालिका लोकप्रिय झाली.
सतरंगी फ्रेशर्सची अतरंगी यारी....
१.सम्राट पाटील(शुभांकर तावडे)
मूळचा कोल्हापूरच्या शेतकरी घरात जन्मलेला,रांगडा गडी, कब्बडची विशेष आवड असणारा,खादाड,मनाने साधा व निर्मळ असणारा.
२.सायली बनकर (मिताली मयेकर)
मूळची नाशिकची असणारी डॅशिंग,स्पष्ट बोलणारी,खूपच फोकस असणारी आणि आपल्या कुटुंबाचा भार पेलणारी(पार्ट टाइम नौकरी करून),हीला भविष्यात चॅनेल हेड व्ह्यायचे आहे.
३.परी देशमुख (अमृता देशमुख)
मूळची लातूरची असणारी परी एका श्रीमंत राजकारणी घरात जन्माला आलेली,अत्यंत लाडावलेली,मनाने स्वच्छ परंतु सतत नाकावर तोरा मिरवणारी,खूप सुंदर कविता करणारी.
४.रेणुका भिलारे (रसिका वेंगुर्लेकर)
मूळची रायगडची असणारी बाबाची लाडली,मनाने साधी व भोळी असणारी,खाण्याची विशेष आवड असणारी मँगो बर्फी,पत्रकार होण्याची इच्छा असणारी.
५.मनवा राजे (रश्मी अनपट)
मूळची मुंबईतील वाळकेश्वर येथील करोडपती उद्योगपतीची एकुलती एक मुलगी,परंतु साधी सरळ सर्वांना सांभाळून घेणारी,वाचनाची विशेष आवड असणारी हुशार मुलगी,सारखी सेल्फी क्लीक करणारी शांत मुलगी.
६.धवल मिठबावकर (ओंकार राऊत)
मूळचा मुंबईचा असून लालबागची शान असणारा,सतत भंकस करणारा,जुगाडचा बादशाह,आपल्या आजीवर जिवापाड प्रेम करणारा.
७.नीरव देसाई(सिध्दार्थ खिरीड)
मूळचा धनिक डॉक्टर कुटुंबामध्ये जन्मलेला,स्वतःच स्वप्न पूर्ण करण्यासाठी घरच्यांशी भांडून आलेला हुशार,स्मार्ट,विचारी,सर्वांची समजूत घालणारा,सर्वाना समजून घेणारा, फिल्म मेकर बनण्याची आकांशा बाळगणारा.
मालिकेचे शीर्षकगीत
सतरंगी स्वप्नांची ही स्टोरी
आकाशी घेऊया भरारी
फ्रेशर्स… फ्रेशर्स…
जगुया बिंधास्त आपली मर्जी
आपली तर स्वप्न एकदम वरची
कॉलेजच कैंपस Google यारी
Searching तो जनहित मे हे जारी
ज़िन्दगी प्रेमाची मिठाई
जिंकण्याच टॉनिक डेरिंग देई
कॅफे मे चिल मारू
यारा सेल्फी बार बार
शेयरिंग का जमाना सुन ना
वाय-फाय वाला प्यार
ऑनलाइन ऑफलाइन … फ्रेशर्स
टैग लाईक पोस्टिंग … फ्रेशर्स
ब्रेक-अप मूव्ह ऑन … फ्रेशर्स
फ्रेशर्स या मालिकेच्या शीर्षक गीताचे संगीत दिग्दर्शन लोकप्रियसंगीत दिग्दर्शक अमित राज यांनी केले आहे.वलय मुळगुंद यांनी हे गीत लिहिले असून अमित राज, आरती केळकर, हर्षवर्धन वावरे आणि कस्तुरी वावरे यांनी हे शीर्षक गीत गायले आहे.फ्रेशर्स मालिकेतील मनवा राजे (रश्मी अनपट), परी देशमुख (अमृता देशमुख),रेणुका भिलारे (रसिका वेंगुर्लेकर), सायली बनकर (मिताली मयेकर),नीरव देसाई(सिध्दार्थ खिरीड), सम्राट पाटील(शुभांकर तावडे),धवल मिठबावकर (ओंकार राउत)या सात मित्रांवर हे गाणे चित्रित केले आहे. कॉलेजची मजा – मस्ती, मैत्रीचं निखळ नातं, हळूहळू उमलत असणारे प्रेम,तरुण मनाचं – त्यांच्या स्वप्नाचं, आशा-आकांक्षा यांच चित्रण या गाण्याच्या दिग्दर्शनातून आणि शब्दामधून टिपण्याचा केलेला अचूक प्रयत्न प्रेक्षकांना खूप आवडला हे गाण्याला मिळालेल्या प्रतिसादातून कळतं. शीर्षक गीतामध्ये पहायला मिळणारी दोस्ती–यारी, कॉलेज - विश्व, कथासूत्रातील नाविन्यता, चकचकित फ्रेश-सादरीकरण, नात्यांमधला गोडवा अत्यंत सुरेख पद्धतीने या मालिकेमध्ये दाखवला गेला.मालिकेची कथा संजय जाधव आणि आशिष पाठारे ह्यांनी लिहिली होती.
ही मालिका बघताना प्रत्येकालाच आपले कॉलेज विश्व आठवते ह्या काही शंका नाही.एकूण २११ भाग ह्या मालिकेचे चित्रित झाले.त्यावेळेस ऑफिसमुळे संपूर्ण मालिका बघता आली नव्हती परंतु ह्या लोकडोऊनमध्ये यूट्यूबवर सर्वच्या सर्व म्हणजे २११ भाग बघितले.खूप मज्जा आली.सात मित्रांची मैत्री जणू इंद्रधनुष्याच्या सात रंगाप्रमाणे वाटावी अशी आहे.त्यांनी सात जणांनी केलेला एकत्र अभ्यास असो की, त्यांनी केलेली एकांकिका असो की , प्रोजेक्ट-असायमेंट असोत सर्वच खूप मस्त चित्रित केले गेले.कितीही संकटे आली तरी आपला आपल्या मैत्रीवर विश्वास असेल तर आपण त्या संकटाचा खंबिरपणे मुकाबला करू शकतो हे ह्या मालिकेच्या शेवट शेवटच्या भागांमध्ये दाखवण्यात आले.
- सुयश गावड
मित्रा आपण खरं खरं सांगतो
मित्रा आपण खरं खरं सांगतो
तुझ्यासाठी आपण दुनियेला वाऱ्यावर सोडतो
साथ सोडून नेमके पळून जातात सगळे
अचानक हरल्यासारख वाटायला लागते
तेव्हा तू एकटा गदागदा हलवून
माझीच मला ओळख करून देतो
जखमावर फुंकर घालून पुन्हा लढायला उभं करतो
म्हणून मित्रा आपण खरं खरं सांगतो
तुझ्यासाठी आपण दुनियेला वाऱ्यावर सोडतो
बंगला कार सगळं काही मिळुन जात पैश्यात
मानमरबत प्रसिद्धी कमवतात सर्व लोक लाचारीतून
थोडं तरी बईमान झालो तरी हक्काने
रट्टा हाणून तूच मला माणसात आणतो
तुझ्यासारखा मित्र लई नशिबाने मिळतो
म्हणून मित्रा आपण खरं खरं सांगतो
तुझ्यासाठी आपण दुनियेला वाऱ्यावर सोडतो
(फ्रेशर्स या मालिकेतील कविता)
जादूचा दिवा
कधी रुसले
कधी हसले
कधी हरले
तर कधी धडपले
कधी उधळले
तर कधी शहारले
कधी दुरावले
तर कधी सरावले
कधी शब्दांनी दुखावले
तर कधी मायेने सुखावले
या वाटेवर चालताना
कुशीत तुमच्या विसावले
जगण्या जराही गम्मत नसते
जेव्हा तुमची साथ नसते
प्रत्येक पावलावर जी आधार असते
ती मैत्रीचं जादूचा दिवा असते
(फ्रेशर्स या मालिकेतील कविता)
☺️😊😊👍👍👍
ReplyDelete