Saturday, July 15, 2023
पेनकिलर....
पेनकिलर....
लेखक चेतन ह्यांचे काहूर पुस्तक वाचले होते तेव्हापासून माझे त्यांच्या लिखाणावर प्रेम जडले होते.त्यांचे दुसरे पुस्तक पेनकिलर आज वाचून पूर्ण झाले ..पुस्तक वाचून मन सुन्न झाले आहे....कळत नाही आहे की कोण असेल पेनकिलर....पुस्तक वाचून झाल्यावर समजले की पुस्तकाचे नाव पेनकिलर का आहे....अप्रतिम वर्णन केले आहे लेखक चेतन ह्यांनी....उत्सुतकता ताणून धरली आहे कोण असेल खुनी...काय संबंध असेल कर्जत केसशी....ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे लेखक चेतन ह्यांच्या पुढच्या पुस्तकात मिळतील कदाचित... लेखक चेतन ह्यांनी सुंदर गूढ कथा आपल्या समोर मांडली आहे.त्यांनी केलेले खुनाचे विदारक चित्र डोळ्यासमोर तसेच्या तसे उभे राहते.त्यांच्या लेखणीची हीच जादू आहे की आपल्या डोळ्यासमोर visual उभे राहतात.पुस्तक वाचताना आता पुढे काय होणार असे सारखे वाटत राहते. मित्रा लवकर पुढचे पुस्तक येऊ दे....कोण असेल पेनकिलर मला जाणून घ्यायचे आहे.सत्याची डार्क बाजू जाणून घ्यायची आहे....खरंच पुस्तक नावाप्रमाणे pain देणारे आहे.
पेनकिलर अंत लवकर येऊ दे..अनेक शुभेच्छा मित्रा!!!
- तुझाच एक वाचक
सुयश गावड
Subscribe to:
Posts (Atom)
-
गोधडी गोधडी....मायेची ऊब. आईच्या किंवा आजीच्या साडीची, लुगड्याची हाताने शिवलेली गोधडी.त्यांच्या मायेसारखीच मऊसूत व तलम.आपल्या महारा...
-
झोपाळा... झोपाळा... सर्वांच्याच आवडीचे ठिकाण.लहानपणी मला पण आपल्या घरी एक झोपाळा असावा असे नेहमी वाटायचे.पण मुंबईसारख्या शहराम...