Friday, August 26, 2022

ती माहेरी जाताना


आज ती माहेरी जाताना थोडी नाराज होती
नेहमीसारखा उत्साह ओसंडून वाहत नव्हता
माहेरी जायच्या आधीचे प्लॅन्स नव्हते
मलाही थोडे आश्चर्य वाटले ह्यावेळी असे कसे झाले
मी सकाळी ऑफिसला निघताना तिला आवाज देऊन निघतो
आज आवाज दिल्यावर तिने प्रतिसाद देत मला थांबवले
ती आली स्वयंपाक घरातून बाहेर आणि बिलगली मला
तत्क्षणी समजले नाही मला काय झाले 
तिला बाजूला सारून विचारले काय झाले तुला
तब्येत बरी नाही का तर उत्तर आले बरी आहे मी
मग मी विचारले काय झाले तर ती म्हणाली मला नाही जायचे माहेरी
मला पण थोडे अजब वाटले असे काय ही बोलते आहे
मग मला म्हणाली मिस करा मला,आठवण काढा माझी..
पण त्या वेडीला कुठे माहीत आठवण काढण्यासाठी  विसरावे लागते 

- सुयश गावड