Saturday, February 5, 2022
काहूर
काहूर
फेसबुकवर चेतनची काहूर कादंबरी बघितली.मुळात ह्या कादंबरीचे काहूर हे नावच जास्त आवडले आणि मग मनाला उत्सुकता लागली काय असेल ह्या कादंबरीमध्ये. कारण प्रत्येक गोष्टीला एक कारण असतं. ही कादंबरीची टॅग लाईन जास्त भावली होती मला.आणि ओळख नसतानासुद्धा चेतनला मेसेज केला की तू लिहिलेली कादंबरी मला हवी आहे आणि त्याने पण पटकन कादंबरी मला पाठवून दिली.
जसे पुस्तक मिळाले तसे वाचायला सुरुवात केली.आणि मी रमून गेलो कादंबरीच्या कथेमध्ये.प्रत्येक पान वाचताना पुढे काय होईल ह्याची उत्सुकता लागून राहायची.वाचन सुरू केल्यावर जोपर्यत आपण ही कादंबरी वाचून संपवत नाही तोपर्यत दुसऱ्या कोणत्याही गोष्टींत आपलं मन लागत नाही एवढं या कादंबरीचे गारुड मनावर होते मला वाटते हेच लेखक चेतन ह्याचे यश आहे.
सिद्धार्थ,अमर,विशाल,गणेश,अनघा,निलेश आणि डॉ.रोहन हे पात्र आपल्या नजरेसमोरून लवकर काही केल्या हटत नाही..ह्या सर्व पात्रांबरोबर आपण एवढे गडून जातो हेच आपल्याला समजत नाही.कादंबरीचा विषय,कथा ही खूप वेगळी आणि हटके आहे.ही कादंबरी आपल्याला खूप काही नकळत शिकवुन जाते.नैराश्य किंवा मानसिक आजार कशाप्रकारे वरून धडधाकट दिसणाऱ्या माणसाला कसे पोखरतात हे ह्या कादंबरीमध्ये दिसून येते.फोटोफ्रेमपासून कथेला सुरवात होते ते कॅम्पफायरपर्यंतचा प्रवास म्हणजे एक परिपूर्ण कथा आहे.
एखाद्या चित्रपटाची कथा असावी तशी ह्या कादंबरीची कथा आहे.लेखकाने कादंबरीमध्ये मांडलेली पात्र आपल्या डोळ्यासमोर तशीच्या तशी उभी राहतात. १९६ पृष्ठाची ही कादंबरी कधी एकदा वाचून संपवतो आणि कादंबरीचा शेवट काय असेल असे मला वाचतांना झाले होते.आणि कादंबरी वाचून झाल्यावर मन सुन्न झाले आणि अनेक प्रश्नांचे काहूर मनात घर करून राहिले.आणि मग उमगते लेखकाने कादंबरीचे नाव काहूर का ठेवले असावे.वेगवेगळ्या भावनांचे आणि वेगवेगळ्याच्या मनातील भावनांचा उद्रेक म्हणजे काहूर.कारण प्रत्येक गोष्टीला एक कारण असतं.हे लेखकाचे म्हणणे मनाला तंतोतंत पटते.
चेतन मित्रा तुला माहीत नाही तुझ्या हातून किती सुंदर कथा लिहून झाली आहे.अश्याच सुंदर कादंबऱ्या लिहीत राहा.तुझ्या लेखन.शैलीची दाद दिली पाहीजे.उत्तरोत्तर असेच लिखाण करत रहा.तुझ्या पुढच्या कादंबरीची आतुरतेने वाट बघतो आहे.तुझ्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!!!
काहूरचा एक वाचक
- सुयश गावड
Thursday, February 3, 2022
-
गोधडी गोधडी....मायेची ऊब. आईच्या किंवा आजीच्या साडीची, लुगड्याची हाताने शिवलेली गोधडी.त्यांच्या मायेसारखीच मऊसूत व तलम.आपल्या महारा...
-
झोपाळा... झोपाळा... सर्वांच्याच आवडीचे ठिकाण.लहानपणी मला पण आपल्या घरी एक झोपाळा असावा असे नेहमी वाटायचे.पण मुंबईसारख्या शहराम...