प्रिय मित्रास...
शशी डंभारे....माझ्यासाठी शशी ताई....कवितेचे पान ह्या कार्यक्रमात शशी ताईंना पहिल्यांदा मधुराणी गोखले-प्रभुलकर ह्यांच्यासोबत पाहिले.व त्यांच्या कविता ऐकल्या.त्यांच्या कविता ऐकून खूपच भारावून गेलो मी.आणि मग त्यांच्या काव्यसंग्रहाचा शोध घेऊ लागलो.लोकडोवून असल्याने ऑनलाईन मिळते का शोधू लागलो पण ते पुस्तक काही ऑनलाईन नाही मिळाले.त्यानंतर दिवाळीनंतर मुंबईमध्ये आल्यानंतर पण दादरच्या सर्व दुकानात शोध घेतला पण तिथेही नाही मिळाले.निराश झालो आणि शशी ताईंना फेसबुकवर हुडकून काढले आणि त्यांना मेसेज केला की मला प्रिय मित्रास हा काव्यसंग्रह हवा आहे तो कुठेच मला उपलबद्ध होऊ शकला नाही.ताईने मेसेज केला की तुमचा पत्ता पाठवा मी पोस्टाने पाठवते.मी पत्ता पाठविले व ताईने लगेच काव्यसंग्रह पाठविला. मी ताईंना किती पैसे झाले ते विचारले ताई म्हणाल्या पुस्तक मिळाले की पाठवा. आज पुस्तक मला मिळाले.ताईंना मेसेज करून कळवले पुस्तक मिळाले किती पैसे द्याचे तर ताई म्हणाल्या पुस्तक वाचा आणि आपण भेटू तेव्हा द्या पैसे.ओळख नसताना ही ताईने ज्या विश्वासाने पुस्तक पाठवले ना पैसे घेता हे बघून खूप भारावल्यासारखे झाले.आणि खूप आनंद झाला.लगेच पुस्तक वाचून काढले.मैत्री हा विषय सर्वांच्या जिव्हाळाचा असतो. आणि शशी ताईने त्याचा विषयाला हात घातला आहे.
कवितासंग्रहातील काही कविता मी कवितेचे पान ह्या कार्यक्रमात ऐकल्या होत्या आणि मी ताईंच्या कवितेच्या प्रेमात पडलो होतो मी.मैत्रीवर आधारलेल्या ह्या कवितासंग्रहातील कविता तर खूपच भावुक करतात.आणि आपण पण आपल्या आठवणीच्या डोहातील अमृता इमरोज नकळत भेटतो.आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर भेटलेल्या सर्व मित्रांची आठवण येते.
प्रिय मित्रास...ह्या कवितासंग्रहातील सर्वच कविता खूप छान आहेत परंतु मला विशेष भावलेल्या कविता म्हणजे सखी,तू,चहा,कॉफी,मौनचा प्रवास,क्षमा,घर,सखा.शशी ताईची चहा कविता तर निनावी नावाने किती तरी दिवस सोशल मीडियावर फिरत होती. ताईची लेखनशैली फारच साधी सरळ आणि सोपी आहे.ओघवती म्हणू शकतो कारण ती थेट आपल्या काळजाचा ठाव घेते.आणि त्यांची कविता आपली होऊन जाते.
शशी ताई अश्याच सुंदर कविता कायम लिहीत राहा.आणि आम्हाला आनंद देत राहा.पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा ताई !!! ताई लवकरच भेटू आपण.
- सुयश गावड